मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही खूप सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये इलियानाने मोजकेच चित्रपट केले आहेत. पण प्रत्येक चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे.  पण तुम्हाला माहीत आहे का की, एकदा ही अभिनेत्री सगळ्यांसमोर Oops Moment ची  शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी बोलायला व्हायचा त्रास 
अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हिची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिचे 'बादशाहो' आणि 'मुबारकान' हे चित्रपट लोकांना प्रचंड आवडले. इलियाना डिक्रूज देखील तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. मुंबईत जन्मलेल्या आणि गोव्यात वाढलेल्या इलियानाला हिंदी बोलण्याचा खूप त्रास होत होता. 


ती हिंदीपेक्षा इंग्लिश चांगली बोलते. अशा खूप कमी अभिनेत्री आहेत. ज्या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरतात. इलियाना देखील त्यापैकीच एक आहे.


पहिल्या बॉलीवूड चित्रपटात पुरस्कार मिळाला
2012 मध्ये, इलियानाने अनुराग बासूच्या 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती 2006 पासून साऊथ चित्रपटांमध्ये काम करत होती. अनुराग बासूची हृदयस्पर्शी कथा 'बर्फी'ला इलियाना डिक्रूझला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या अवॉर्ड शोदरम्यान इलियानासोबत असं काही घडलं, जे तिला आजही आठवतं.


एवॉर्ड घेताना फाटला ड्रेस
खरं तर, जेव्हा इलियानाला पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा ती बर्फीच्या संपूर्ण टीमसोबत स्टेजवर पोहोचली. पण स्टेजवर जाताच तिचा ड्रेस मागून फाटला आणि तिने स्वतःला लपवायला सुरुवात केली. 


इलियानाने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, जेव्हा तिच्यासोबत हे घडलं तेव्हा ती खूप घाबरलीही होती. मात्र त्यादरम्यान कोणीच ही गोष्ट नोटीस नाही केली. आणि तिनेही याकडे दुर्लक्ष करत पुरस्कार स्वीकारला. 'बर्फी' या चित्रपटाने त्यावर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहा पुरस्कार जिंकले होते.