मुलगा झाला हो! Ileana Dcruz नं सांगितलं नवऱ्याचं नाव; जाणून घ्या लग्नाची तारीख, बाळाचं नाव
Ileana Dcruz Baby: गेल्या अनेक दिवसांपासून इलियाना डिक्रुज हिनं आपले लव्ह लाईफ (Celebrity Love Life) हे खाजगी तरीही सार्वजनिक ठेवले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर तिनं आपल्या पतीचा / बॉयफ्रेंडचा चेहरा लपवलेलाच होता. परंतु आता तिनं आपल्या पतीची ओळख, लग्नाची तारीख आणि बाळाचे नाव व फोटोही चाहत्यांसमोर आणला आहे.
Ileana Dcruz Baby: सेलिब्रेटीचे खाजगी आयुष्य म्हणजे माध्यमांमधला सर्वात चर्चिला जाणारा विषय असतो. त्यातून गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ती म्हणजे इलियाना डिक्रुज या अभिनेत्रीची. एप्रिल महिन्यात तिनं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यामुळे तिची समाजमाध्यमांमध्ये चांगलीच चर्चा पिकली होती. तेव्हापासून नेटकऱ्यांंमध्येसुद्धा अनेक चर्चा या रंगलेल्या होत्या. यामध्ये नक्की तिचे लग्न केव्हा झाले?, लग्नाशिवाय ती गरोदर आहे का?, असे एक ना अनेक प्रश्रांची कुजबुज सुरू होती. त्याचसोबतच तिनंही आपल्या पतीचा अथवा बॉयफ्रेंडचा चेहरा जगासमोर आणला नव्हता. तिनं बाळाच्या वडिलांबद्दल सर्व माहिती ही गुप्तचं ठेवली होती. आता मात्र तिनं या सर्व चर्चांना पुर्णविराम दिलेला आहे. काल रात्री तिनं इन्टाग्रामवरून आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे आणि सोबतच त्याचे नावंही जाहीर केलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंतराअंतरानं तिनं आपल्या पतीचा फोटो पोस्ट करायला सुरूवात केलेली होती. त्यातही तिनं आपल्या पतीचा चेहरा हा लपवलेलाच होता. परंतु अगदी काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या पतीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला होता. तिनं त्याचा आणि आपला एक रॉमेण्टिक फोटो शेअर केला होता. परंतु त्यात तिनं नावं जाहीर केलेलं नव्हतं. आता आपल्या बाळाचा फोटो आणि नावं असलेली एक पोस्ट तिनं काल रात्री आपल्या ऑफिशियल इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केलेली पाहायला मिळाली आहे. यावेळी तिनं बाळाचा फोटो शेअर केलेला आहे. तिच्या बाळाचे नावं Koa Phoenix Dolan (कोआ फिनिक्स डोलन) असं आहे. याचाच अर्थ तिच्या पतीचे नावं हे Phoenix Dolan असं आहे असं तुम्हाला वाटेल परंतु तिच्या पतीचे नावं हे Michael Dolan (मायकल डोलन) असं आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी त्याचा जन्म झाला आहे असं इलियानानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा - K3G मधील Kajol च्या बहिणीनं उरकला साखरपुडा; रोमॅण्टिक फोटो व्हायरल
DNA या न्यूज पोर्टलच्या माहितीनूसार आणि त्यांना मिळालेल्या लग्नाच्या नोंदणीच्या माहितीप्रमाणे इलियानानं यावर्षीच्या 13 मे रोजी तिनं मायकलशी लग्न केले आहे. आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेच्या चार आठवड्यांपुर्वी तिनं लग्न केल्याचे कळते आहे असं डीएनएनं म्हटलं आहे. परंतु त्याआधी एप्रिल महिन्यातच तिनं आपण गरोदर असल्याची बातमी जाहीर केलेली होती. तेव्हा याचा अर्थ असाही लावला जाऊ शकतो की गरोदरपणानंतर तिनं लग्न केलं असावं. परंतु याबाबत तिनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यावेळीच इलियानानं आपला ब्रायडल लुकमधला फोटोही शेअर केलेला होता. परंतु अद्यापही मायकल डोलनबद्दल पुर्ण माहितीसमोर आलेली नाही.
यावेळी आपल्या पोस्टमधून तिनं लिहिलं आहे की, ''तुम्हाला सांगण्यास फार आनंद होतो आहे की आम्ही आमच्या गोंडस मुलाला जन्म दिलेला आहे ज्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.''