Ileana D'Cruz Baby Bump Photos: अभिनेत्री इलियाना डिक्रूज गरोदर असून सध्या ती आपलं मातृत्व एन्जॉय (Ileana D'Cruz Pregnancy) करताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रेग्नन्सीची गुडन्यूज आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या कौतुकाचा वर्षाव झाला होता. मध्यंतरी तिनं आपल्या प्रेग्नन्सीचा अनुभवही इन्टाग्रामवरून शेअर केला होता. यावेळी तिनं आपल्या बेबी बम्पमधील काही फोटोही इन्टाग्रामवरून शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तिनं ब्लॅक कट स्लिवलेस गाऊन घातला असून केसं मोकळे सोडले आहेत. ती या फोटोंमध्ये अत्यंत देखणी दिसते आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही (Ileana D'Cruz Baby Bump) कमेंट्स केल्या आहेत. (Ileana D'Cruz shares her baby bump photos on instagram after announcing pregnancy)


इलियाना डिक्रुज ही कतरिना कैफच्या भावाला डेट (Katrina Kaif Brother Ileana D'Cruz Dating) करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु इलियानानं कसलीही पुर्वकल्पना न देता आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. इलियानानं काही दिवसांपुर्वी रॅपर बादशहासोबत एक गाणं केलं होतं. जे सोशल मीडियावरही खूप व्हायरल झालं होतं. परंतु इलियाना अभिनयापासून दूर आहे. तिन ओटीटीवरही पदार्पण केलं आहे पण आता ती पुर्णवेळ आपल्या घराकडे वेळ देताना दिसते आहे. 


इलियाना डिक्रुजचे सध्या बेबी बम्पमधील लेटेस्ट फोटो चाहत्यांसमोर आले आहेत. काल तिनं आपले काही फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका लक्झरीयस हॉटेलमध्ये दिसते आहे. तिथून तिनं हे फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो तिनं कुठे काढलं आहेत याबद्दल तिनं माहिती दिलेली नाही. आपले हे फोटोज शेअर करताना तिनं 'बंप अलर्ट' असं कॅप्शन टाकलं आहे. मलायका अरोरा, तमन्ना भाटिया, अथिया शेट्टी, नर्गिस फकरी, सोफी चौधरी यांच्यासह इंडस्ट्रीतल्या अनेकांनी तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 


हेही वाचा - ''...तेव्हा फार दु:ख होतं'', वडिलांबद्दल बोलताना Katrina Kaif भावुक



इलियानानं आपल्या पतीचे किंवा बॉयफ्रेंडचं नावं रिव्हिल न केल्यानं तिला काही लोकं ट्रोलही करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला थेट बाळाचे वडिल कोण? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींना ही विवाहित आहेत का? यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या या फोटोवर चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत आणि इलियानाचं कौतुक आणि तिचं अभिनंदनही केलं आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून मलायकानंही (Malaika Arora on Ileana D'Cruz Baby Bump Photos) खास कमेंट केली आहे.