मुंबई: आमिर खान यांच्यानंतर आता मनोरंजन विश्वातील आणखी एका प्रसिद्ध जोडीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 13 वर्षांच्या सुखी संसारानंतर आता ह्या कपलनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक चाहत्यांची निराशा देखील झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानपाठोपाठ आणखी एका कपलने तलाक घेतला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ संगीत दिग्दर्शक डी. इम्मान यांनी याबाबत माहिती दिली. सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. 


डी. इम्मान यांनी बुधवारी जाहीर केले की त्यांची पत्नी मोनिका रिचर्डसोबत तलाक घेतला आहे. या दोघांनी एकमेकांच्या संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या हितचिंतकांनी माझ्या संगीताला नेहमीच पाठिंबा दिला. त्यासाठी मी आभारी आहे.  मोनिकासोबत माझा एकमेकांच्या संमतीने घटस्फोट झाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं इम्मान यांनी सांगितलं आहे. 


इम्मान हे तमिळ फिल्म इंडस्ट्रिमधील सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आमिर खाननंतर तब्बल 13 वर्ष एकत्र राहून या कपलनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.