मुंबई :  बॉलिवूडमधील एक अभिनेता आपल्या पहिल्याच सिनेमाने सुपरहिट ठरला. अगदी पहिला सिनेमा सुपरहिट दिल्यामुळे या अभिनेत्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सिनेमा चालला नाही. अनेक सिनेमांत अभिनेता म्हणून आपलं नशिब आजमावल्यानंतर आता हा अभिनेता दिग्दर्शनाकडे वळला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानची मुलगी आयरा हिने नुकतीच मुंबईत बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत एंगेजमेंट केली. यावेळी आयराची आई  आमिर खानची एक्स पत्नी रीना दत्त, किरण राव, फातिमा सना शेख आणि इतर अनेकजण यावेळी या कार्यक्रमात दिसले. मात्र, एका खास पाहुण्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तो त्याच्या काळातील चॉकलेट हिरो होता. आमिर खानचा पुतण्या  अभिनेता इम्रान खान निळ्या रंगाच्या ब्लेझर आणि पॅन्टमध्ये खूप सुंदर दिसत होता


'जाने तू या जाने ना' मधून प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आता अभिनयापासून दूर गेला असला तरी चाहत्यांना आजही त्याची आठवण आहे. त्याने अभिनया क्षेत्रात परतावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहून एका चाहत्याने लिहिलं, "अरे देवा! इम्रान... तू खूप देखणा दिसत आहेस." दुसर्‍या युजरनं लिहिलं, "कृपया त्याला विचारा की तो कुठे आहे ."  


इम्रान खानने वयाच्या ५ व्या वर्षी कयामत से कयामत तक या चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने राज युवा आमिर खानची भूमिका साकारली होती. इम्रान खानने 2008 मध्ये 'जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. एका रिपोर्टनुसार, इम्रानचा मित्र अक्षय ओबेरॉय याने पुष्टी केली की अभिनेत्याने अभिनय जगताला अलविदा केला आहे. तो पुढे म्हणाला की इम्रानला चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल.


इम्रान खानला प्रसिद्धीपासून दूर होऊन जवळपास ५ वर्षे झाली आहेत. इम्रान खानच्या इतर चित्रपटांमध्ये मेरे ब्रदर की दुल्हन, दिल्ली बेली, आय हेट लव स्टोरीज, गोरी तेरे प्यार में, लक आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई यांचा समावेश आहे.