Imran Khan and Lekha Washington Affairs : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) भाचा इमरान खान (Imran Khan) आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. इमरान आणि अवंतिका 2019 सालीच विभक्त झाले असले तरी ते नेहमीच चर्चेत असतात. अवंतिकासोबत विभक्त झाल्यानंतर इमरानच्या आयुष्यात दुसरं कोणी आल्याचं म्हटलं जात आहे. कारण इमरान बऱ्याच काळानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसला आणि त्यावेळी त्याच्यासोबत एक अभिनेत्री दिसली होती आणि या सगळ्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Imran Khan Is In Relationship) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इमरानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. इमरानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इमरानसोबत इतर काही लोक दिसत आहेत. पण यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे इमरानसोबत असलेल्या अभिनेत्री लेखानं (Actress Lekha Washington) . लेखा आणि इमराननं ज्या प्रमाणे एकमेकांचा हात पकडला आहेत. त्याप्रमाणे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी इमराननं काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं आहे. तर लेखानं काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा ड्रेस परिधान केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे व्हिडीओत दिसणारी अभिनेत्री लेखा वॉशिंगटन? (Lekha Washington)


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेखा वॉशिंगटन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लेखानं तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. लेखानं अभिनय क्षेत्रात 'फ्रेम्ड’ या इंग्रजी चित्रपटातून केले होते. दरम्यान, हिंदी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर ‘युवा’, ‘मटरू की बिजली का मनडोला’ आणि ‘पीटर गया काम से’ या चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. तर, ‘मटरू की बिजली का मनडोला’ या चित्रपटात इमरान आणि लेखानं एकत्र काम केले होते. 


हेही वाचा : 'तू माझी पहिली...', रेणुका शहाणेच्या पोस्टवर उत्तर देत हे काय बोलून गेला Shahrukh Khan


अवंतिका आणि इमरानने 2011 मध्ये लग्न. त्यांना एक मुलगी देखील आहे. पण त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे अवंतिकाने इमरानचे घर सोडले. आता इमरान लेखाला डेट करत असून त्याच्या मित्रमैत्रीणींशी ओळख करुन देत आहे अशा चर्चा रंगल्या आहेत. 


इमरान खानच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून तो प्रकाश झोतात आला. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटानंतर इमराननं कोणताही हिट चित्रपट दिला नाही इतकंच काय तर त्यानं 2015 साली अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.