Imran Khan : बॉलिवुड अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान हा एकेकाळई त्याच्या अभिनयासोबत लुकसाठी ओळखला जायचा. अभिनेता इम्रान खानचे करिअर छोटं जरी असलं तरी त्याने स्वतःची खास ओळख निर्माण केली होती. इम्रान खान हा बऱ्याच काळापासून बॉलिवुडपासून दूर आहे. असं असलं तरी त्याचे चाहते त्याला मोठा पडद्यावर पाहण्यास इच्छुक आहेत. मात्र इम्रान खान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच सध्या फार चर्चेत आला आहे. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता इम्रान खान त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत भाड्याच्या घरात राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता इम्रान खान हा गेल्या अनेक वेळापासून अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याची गोष्ट मान्य केली आहे. त्यानंतर आता दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, इम्रान खान हा त्याची गर्लफ्रेन्ड लेखा वॉशिंग्टनसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहे. यासाठी त्यांनी वांद्रे येथील एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. आश्चर्याची बाब म्हणज्ये या घराचा मालक हा दिग्दर्शक करण जोहर हा आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षासाठी इम्रान खानने हे घर भाडेतत्वावर घेतलं आहे. हा करार 20 मार्च 2024 रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. या तीन मजल्यांच्या या घरासाठी इम्रान खानला करण जौहरला तब्बल 9 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. वांद्रे हे केवळ इम्रानचेच नाही तर बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. वांद्र्यात सेलिब्रिटींना रहायला खूप आवडते. वांद्रे येथे शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम अशा अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत.


इम्रान खानने अवंतिका मलिकसोबत लग्न केले होते. आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नासारखा मोठा निर्णय घेतला होता. मात्र हे लग्न फार काळ टिकूव शकलं नाही आणि या दोघांचा 2019 साली घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी आहे जिचं नाव इमारा आहे. 2019 मध्ये दोघांच्या वेगळ्या होण्याची बातमी समोर आली. इम्रान खानच्या घटस्फोटाची बातमी समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्याच वेळी, लेखा वॉशिंग्टनचे पहिले लग्न पत्रकार पाब्लो चॅटर्जीसोबत झाले होते. पण तिचेही लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.