Imtiaz Ali on not woking with Amitabh Bachchan : अमर सिंग चमकीलाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. आजवर इम्तियाज अलीनं बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं. पण त्यांनी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं नाही. इतकंच नाही तर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही असं म्हटलं होतं. त्याचं कारण काय असा प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण सुद्धा इम्तियाज अली यांनी शेअर केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्तियाज अली यांनी नुकतीच मिडडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत इम्तियाज अली यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला त्यांना भिती वाटते. तर त्यांना याविषयी देखील माहित आहे की बिग बी त्यांच्यासोबत काम करण्यास देखील तयार होतील. इम्तियाज अली यांनी पुढे सांगितलं की बिग बी मेगास्टार आहेत आणि त्याची तुलना शाहरुख खान यांच्या स्टारडमशी करण्यावर सांगितलं की त्यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. 



इम्तियाज अली यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांच्यासोबत काम करण्यास काचकूच करत होते. कारम त्यांना बिग बींची भिती वाटत होती. त्याशिवाय अमिताभ यांना लांबूनच नमस्कार करण्याची त्यांची इच्छा होती. इम्तियाज अलीनं सांगितलं की ते अमिताभ बच्चन यांना भेटायला देखील घाबरायचे कारण त्यांना या गोष्टीवर विश्वास होता की बिग बी त्यांच्यासोबत काम करण्यास तयार होती. 


इम्तियाज यांनी पुढे सांगितलं की मी एक छोट्या ठिकाणाहून येतो आणि मी त्यांचं स्टारडम पाहिलं आहे. 1985 मध्ये गिरफ्तार या चित्रपटातील एका सीनला पाहिल्यानंतर थिएटरमध्ये लोक वेडे झाले होते. लोकांनी हॉलमधील सीट्स तोडल्या. मी आजही चाहत्यांचा उत्साह आणि प्रेमा अनुभवतो. त्यामुळे मी ठरवलं की त्यांना लांबून नमस्कार करणार. ते जमिनीशी जोडलेले आहेत. 


पुढे इम्तियाज अली यांनी सांगितलं की रॉकस्टारच्या प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना बिग बींनी एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात बिग बींनी रणबीर कपूर आणि नरगिस फाखरीच्या या चित्रपटाची स्तुती केली.


हेही वाचा : कंगना रणौतनं Love Life वर दिले टिप्स! म्हणाली, 'पुरुषांना आवडत नाहीत अशा मुली...'


इम्तियाज अली आणि अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत कधीच कोणत्या चित्रपटात एकत्र काम केलं नाही. तर त्या दोघांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. 2017 मध्ये बिग बींसोबत इम्तियाज अलीनं एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. ज्यात ते दोघे मिठी मारताना दिसत आहेत. दरम्यान, हा फोटो शेअर करत इम्तियाज अली यांनी कॅप्शन दिलं होतं की जेव्हा मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं तेव्हा माझ्या आईनं सांगितलं की आता तू दिग्दर्शक झाला आहेस. 


दरम्यान, याआधी दिग्दर्शक अनुराग कश्यपनं देखील एका मुलाखतीत म्हटलं होतं की त्याला शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं नाही. त्याचं कारण म्हणजे त्या कलाकारांचं एक वेगळं स्टारडम आहे आणि त्यांच्या प्रेक्षकांना काही तरी वेगळं पाहायचं असतं.