मुंबई -  अभिनेता आमिर खान आणि शाहरुख खान हे दोघे २०१८ मध्ये फिल्मी दुनियेत आपला अंदाज दाखवण्यात फेल ठरले. शाहरुख खानचा झिरो आणि आमिरचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हे दोन सिनेमे चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपात्र ठरले. २०१९ मध्ये आमिर खान दमदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. आमिर गजनी २ सिनेमासाठी तयारी करतो आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर आता गजनी २ सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर प्रचंड शारीरिक मेहनत करतोय. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’नंतर आपण चाहत्यांना नाराज केले असल्याचे सांगत त्याने माफी  मागितली होती. गजनी २ सिनेमाचे दिग्दर्शन कोण करणार हे समजलेलं नाही. गजनी सिनेमांचे दिग्दर्शन ए.आर.मुरगदास यांनी केले आहे. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गजनी सिनेमामध्ये आमिर आणि आसिन या जोडीला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 



 



एककाळ गाजवणारे खान हल्ली चांगली कामगिरी करताना दिसत नाहीत. हे खान आता बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री करण्याच्या मार्गावर आहेत. शाहरुख खान डॉन ३च्या माध्यमातून धमाकेदार एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत तर दुसरीकडे आमिर खान मोठी शारीरिक मेहनत करतोय.  सलमान खान सुद्धा यात मागे नाही. 'भारत' सिनेमाच्या शूटिंगमध्ये सलमान व्यग्र आहे. सिनेमात सलमान आणि कटरिना एकत्र चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सध्या सलमान आणि कटरीनाचा एक फोटो व्हायरल होतो आहे. सलमानने सायकल चालवतानाचा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आता कोणत्या खानचा सिनेमा किती गल्ला जमवणार हे पाहणे मजेशीर होणार आहे.