मुंबई: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या 15 व्या सीजनची घोषणा झाली आहे. यावेळी देखील या नव्या सीजनबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या शोमध्ये बरेच सेलिब्रिटी चेहरे झळकणार आहेत. जे आपल्या हटके अंदाजात प्रेक्षकांचं लक्षवेधून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न करताना दिसणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा शोच्या होस्टपासून, बऱ्याच गोष्टी खूप बदलल्या आहेत. शो पहिल्या 6 आठवड्यांसाठी OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होईल. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर OTT प्लॅटफॉर्मवर बिग बॉस होस्ट करणार आहे. मात्र, सलमान खानऐवजी करण जोहर शो होस्ट करताना प्रेक्षकांना किती आवडेल हे येणारा काळच सांगेल.


8 ऑगस्टपासून  सुरू होणाऱ्या या शोमध्ये सामील झालेल्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. अलीकडेच, शोच्या पहिली स्पर्धक, प्रसिद्ध गायिका नेहा भसीनच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर या शोचे दोन प्रोमोही रिलीज करण्यात आले आहेत. दरम्यान, आता आणखी एक नाव समोर येत आहे जे याआधी एका वेगळ्या कारणामुळे खूप चर्चेत होतं. स्मॉल स्क्रिनवरील अभिनेत्री निशा रावल


निशा रावलकडून पतीवर  गंभीर आरोप


टीव्ही अभिनेत्री निशा रावलने काही काळापूर्वी तिच्या पतीवर अनेक गंभीर आरोप केले होते. निशाचा पतीदेखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.  अभिनेता करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप निशाने केला होता. 


24 नोव्हेंबर 2012 रोजी लग्न होण्यापूर्वी या जोडप्याने जवळजवळ 6 वर्षे एकमेकांना डेट केले. 2017 मध्ये दोघांनाही मुलगा झाला. करण मेहरा 'ये रिश्ता क्या कहलाता है' या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचला. तो टीव्हीच्या जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता. त्याने 'बिग बॉस 10' मध्येही भाग घेतला होता.


निशा रावलची 'बिग बॉस 15'मध्ये एन्ट्री 


निशाने पतीवर आरोप केल्यानंतर , काही दिवसांनंतर ती करण जोहर होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 15' मध्ये दिसू शकते, या चर्चांनी जोर धरला होता. 'बिग बॉस 15' शोचे निर्माते आणि निशा रावल यांच्यात चर्चा सुरू आहे.


मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ निशाच नाही, इतर अनेक स्पर्धकांसोबत या शोबाबत चर्चा सुरू आहे. सध्या नेहा भसीन व्यतिरिक्त अजून कोणतेही नाव अधिकृतरित्या उघड झालेले नाही. त्यामुळे या शोमध्ये कोणते नवे आणि जुने चेहरे झळकणार याबाबत उत्सुकता कायम आहे.