मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'बिग बॉस 15' या शोची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या घरात रंगणारा स्पर्धेकांमधील वाद आणि खेळ यामुळे प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन होत. आता लवकरच हा शो सगळ्यांच्या भेटीला येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या घरात हे काय सुरु?


'बिग बॉस 15'च्या आलिशान घराची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. त्यानंतर आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात हजेरी लावणारी पुढील स्पर्धक दाखवण्यात आली आहे.पण तिचा चेहरा रिवील करण्यात आलेला नाही.



बोल्ड अंदाज दिसणाऱ्या या मुलीचा अद्याप नाव देखील रिवील झालेलं नाही.  यावेळी बिग बॉसचा शो हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 6 आठवड्यांनंतर हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे


बिग बॉसच्या घरात नवीन एन्ट्री


बिग बॉसच्या घरातील ही स्पर्धक या प्रोमोमध्ये आपले कपडे फाडताना दिसत आहे. हा प्रोमो सध्या खूपच चर्चेत आला आहे.अनेकांनी कमेंट करत शोबाबत उत्सुकता दर्शवली आहे.