मुंबई : बिग बॉस 15 च्या पहिल्या आठवड्यात इतिहास घडला आहे. या हंगामात पहिल्यांदाच पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धकांना एकत्र नोमिनेट केले गेले आहे. याशिवाय, एकाच आठवड्यात जबरदस्त मारामारी आणि अनेक लव्हस्टोरी दिसून येत आहेत. परंतु जिथे प्रेमाचा संबंध आहे, त्यातही हा शो सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस 15 मध्ये मायशा-ईशानचा रोमान्स


घरामध्ये सर्वात जवळचे वाटणारे जोडपे, मायशा अय्यर आणि ईशान सेहगल यांची नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत. घराचे दिवे चालू असोत किंवा बंद असोत, हे जोडपे प्रत्येक वेळी एकमेकांच्या जवळ दिसतात. मिशा आणि ईशान अनेक वेळा एकमेकांसोबत लिपलॉक करताना दिसले आहेत आणि अलीकडच्या एका एपिसोड्समध्ये त्याचा रोमान्स देखील ऑन स्क्रिन दिसून येत आहे.



याशिवाय मायशा अय्यर आणि ईशान सेहगल एकमेकांसोबत बेड शेअर करताना दिसतील. दोघांचा एक रोमान्स करतानाचा व्हिडिओ शेअप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. टीव्हीवर रात्री उशिरा प्रसारित होणाऱ्या बिग बॉसमध्ये अशा गोष्टी सतत टीव्हीवर दाखवल्या जात आहेत.