बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट,नक्की काय आहे प्रकरण?
उमर हे ऐकताच शांत झाला.
मुंबई : टीव्हीचा रिअॅलिटी शो बिग बॉस रोजच चर्चेत असतो. या शोची सुरू होताच त्यात सेलिब्रिटी कपल्सची प्रेमकथाही सुरू होते. पण यावेळी शोमध्ये घडलेल्या प्रकाराने सगळेच हैराण झाले.
शोच्या स्पर्धक तेजस्वी प्रकाशने एक आश्चर्यकारक दावा केला आहे, ज्यामुळे लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. शोदरम्यान ती प्रेग्नेंट असल्याचं सांगताना दिसली होती. ती उमर रियाजशी याबाबत बोलत होती.
तेजस्वीच्या या धक्कादायक खुलाशाने सगळेच थक्क झाले आहेत. पण सलमानने तिला हे काम करायला सांगितले होते. यामुळे तेजस्वीने कॅमेऱ्यावर असं वक्तव्य केलं.
बॉलिवूड स्टार गोविंदा सलमान खानच्या शोमध्ये पोहोचला होता, जिथे या दोन्ही पार्टनर होस्टने तेजस्वीला हे सांगण्यास सांगितले होते. सलमानने त्याचा पार्टनर गोविंदासोबत तेजस्वी प्रकाशला उमर रियाझसोबत असा प्रँक करायला सांगितले होते.
सलमान आणि गोविंदा दोघेही तेजस्वीशी बोलतात की, ती कशी आणि काय बोलेल? त्यानंतर तेजस्वी शोमध्ये उमर रियाजला सांगते की तिला गॅस झाला आहे, ज्यामुळे उमर रियाज हसतो आणि तो हसायला लागतो. ज्यावर प्रकाश ओरडून सांगतो की, हा विनोदाचा विषय नाही. मी आई होणार आहे. उमर हे ऐकताच शांत झाला.