शस्त्रक्रियेनंतर वेगळ्याच लूकमध्ये दिसली ही अभिनेत्री; म्हणाली, तुमच्या प्रार्थनांमुळे...
वाढदिवसापूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही तिने सांगितले.
मुंबई : एक व्हिडिओ शेअर करून सुष्मिता सेनने तिचा नवा लूक चाहत्यांसमोर आणला आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता नवीन लुकमध्ये दिसत असून, तिने मोठा चष्मा लावला आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता चाहत्यांचे आभार मानत आहे. ती म्हटली की, हा माझा नवीन लूक आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 19 नोव्हेंबरला तिचा 46 वा वाढदिवस साजरा केला. सुष्मिता हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सुष्मिता सेनने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांना आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली. वाढदिवसापूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचेही तिने सांगितले. आता सुष्मिताने शस्त्रक्रियेनंतरचा तिचा नवा लूक शेअर केला आहे.
सुष्मिताचा नवा लूक समोर
एक व्हिडिओ शेअर करून सुष्मिता सेनने तिचा नवा लूक चाहत्यांना दाखवला आहे. व्हिडिओमध्ये सुष्मिता लहान केसांमध्ये दिसत असून तिने मोठा चष्मादेखील लावलाय. व्हिडिओमध्ये सुष्मिता चाहत्यांचे आभार मानले . ती म्हणाली की हा माझा नवा लूक आहे. मी सध्या माझ्या शस्त्रक्रियेतून बरी होत आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद.
तत्पूर्वी, वाढदिवसाची पोस्ट शेअर करताना सुष्मिता सेनने लिहिले की, 'मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्यावर इतके प्रेम केले.
मला अनेक आशीर्वाद दिले. माझा हा वाढदिवस आणखी खास बनवला. हा वाढदिवस माझा पुनर्जन्म आहे.
सुष्मिता सेन लवकरच 'आर्या' या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीझनपासून तिने डिजिटल विश्वात पदार्पण केले