मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.


'रानबाजार' या सीरिजचा टीझर प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता.  यात प्राजक्ता माळी अतिशय बोल्ड अंदाजात इंटीमेट सीन देताना दिसली. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं. असाच एक टीझर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील शेअर केला होता.


या दोघींचे बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर आता समोर आलाय,अभिनेत्री उर्मिला कोठारेचा लूक समोर. उर्मिलाने इंस्टग्रामवर 'रानबाजार' या सिरीजचं एक पोस्टर शेअर केलं आहे. यामध्ये ती नेमकी कोणत्या भूमिकेत आहे. हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. प्राजक्ता आणि तेजस्वीनीच्या लूकनंतर उर्मिलाही बोल्ड भूमिकेत दिसणार आहे का याकडे सध्या प्रेक्षकांच लक्ष लागलंय. जर उर्मिलाने या सिनेमात बोल्ड भूमिका साकरली तर उर्मिलाचा हा पहिलाच बोल्ड सिनेमा असेल.



या वेबसिरीजमध्ये  प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजची प्रतीक्षा आहे. ही मराठी इंडस्ट्रीतील आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज ठरेल असं बोललं जातंय