#westandbysalmankhan : सलमान खानच्या पाठिंब्याकरता ट्विटवर चाहते सरसावले
सलमान खानचा सोशल मीडियावर ट्रेंड
मुंबई : सुशांत सिंह राजपूतने मुंबईत राहत्या घरी १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या केल्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत नैराश्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटीझमवर जोरदार चर्चा झाली. यावर बॉलिववूडमधील कंगना रानावत, साहिल खान आणि दिग्दर्शक अभिनव कश्याप यांनी टीका केली आहे. नेपोटीझमचा दावा करत बॉलिवूडमधील सलमान खानवर आरोप केले आहेत.
दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे. माझा अनुभव यापेक्षा काही वेगळा नाही. मी देखील खूप तणावातून गेलो आहे. दहा वर्षांपूर्वी 'दबंग २' च्या मेकिंगमधून अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यामुळे बाहेर काढण्यात आलं. हे लोकं माझं करिअर कंट्रोल करू इच्छित होते. मला खूप घाबरवण्यात आलं. धमकवण्यात आलं. अरबाजने माझा दुसरा प्रोजेक्ट 'अष्टविनायक' देखील खराब केला. तसेच माझ्या 'बेशरम' या सिनेमाला देखील सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी खराब करण्याचा प्रयत्न केला पण तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला.
त्याचप्रमाणे दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईने देखील सलमान खानवर गंभीर आरोप केले आहे. यानंतर सलमान खानला ट्विटवर ट्रोल करण्यात आले. पण त्यानंतर सलमानच्या चाहत्यांनी #westandbysalmankhan हे हॅशटॅगवापरून ट्विट केले. आणि आपलं समर्थन दर्शवलं. ३ लाखाहून अधिक ट्विट सलमान खानच्या समर्थनार्थ केले आहेत.