मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतरही सतत चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाचे नवनवीन फोटो समोर येत आहेत. बॉलीवूडची ही जोडी सर्व फोटोंमध्ये खूप आनंदी दिसत आहे. कतरिनाच्या लग्नाला अनेक पाहुणे आले होते, पण सध्या एक नाव चर्चेत आहे जे लवकरच विकी आणि कतरिनाच्या कुटुंबात सामील होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना कैफची होणारी देवराणी  चांगलीच चर्चेत असते. तिच्या सौंदर्यामुळे आणि सिंपल स्टाईलमुळे ती लक्षवेधून घेते. सध्या अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल अभिनेत्री शर्वरी वाघ हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. विकी कौशलच्या लग्नात देखील शर्वरीने खास हजेरी लावली होती. कतरिनाने देखील तिच्या सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.



शर्वरी वाघ आणि विकीचा भाऊ सनी कौशल यांच्या नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. दोघेही एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत असं ही बोलंल जात आहे. आता शर्वरी लवकरच विकी-कतरिनाच्या कुटुंबाचा भाग होणार असल्याची चर्चा आहे. 



विकी कौशलनंतर त्याच्या भावाच्या ही लव्ह लाईफची चर्चा होत आहे. त्यामुळे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे कतरिना पाठोपाठ शर्वरी देखील कौशल कुटुंबाचा भाग बनण्यासाठी सज्ज आहे. 



शर्वरी वाघने बंटी और बबली २ या चित्रपटातून सिनेविश्वात एन्ट्री केली आहे. तिच्या ग्लॅमरस स्टाईलची अनेकदा चर्चा होते. शर्वरी तिच्या सौंदर्याने आणि तिच्या बोल्ड अंदाजाने अभिनेत्रींना आव्हान देते. शर्वरी तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्षवेधून घेते.