मुंबई : स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात तिरंगा लावण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. आता बॉलिवूडही या रंगात रंगल्याचे दिसत आहे. या मोहिमेत योगदान देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), सलमान खान (Salman Khan), सिद्धार्ध मल्होत्रा (Sidharth Malhotra), क्रिती सेनननं (Kriti Sanon) )  'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठिंबा देत त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं प्रोफाइल बदललं आहे.  तर दुसरी कडे अनिल कपूर (Anil Kapoor), अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगणनं (Ajay Devgn) त्यांच्या ट्विटर अकाऊंटचं प्रोफाइल बदललं आहे. 







बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरुख त्याची मुलं आर्यन आणि अबरामच्या हाती झेंडा फडकवला. शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाने देशाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिक आर्यननं भारतीय जवानांसोबत दिवस घालवला आणि त्यांच्यासोबत तिरंगा फडकवला. कार्तिकनं त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइल पिक्चरमध्ये सर्व जवानांसोबतचा फोटो ठेवला आहे. अजय दवगणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मराठी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं अमेरिकेत यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिवर साजरा केला आहे.