वायरल व्हिडिओच सत्य : इंदर कुमारने खरच आत्महत्या केली का ?
अय्याशीमुळे आपण लक्ष्य भटकल्याचेही तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
मुंबई : बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता इंदर कुमानने २८ जुलै २०१७ ला आपला शेवटचा श्वास घेता. इंदरचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचे म्हटले जाते. पण त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळतोय. या व्हिडिओमुळे इंदरच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.हा व्हिडिओ पाहून तरी असं वाटतय की इंदरने आपल्या मृत्यूआधी स्वत: हा व्हिडिओ शूट केलाय. या व्हिडिओमध्ये इंदर आपल्या अयशस्वी करियरबद्दल सांगताना दिसतो. मी बॉलीवुडचा मोठा अभिनेता नाही बनु शकलो असे इंदर आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. अय्याशीमुळे आपण लक्ष्य भटकल्याचेही तो या व्हिडिओमध्ये सांगत आहे. या व्हायरल व्हिडिओच सत्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आत्महत्या नाही
हा व्हिडिओ इंदरच्या खऱ्या आयुष्यातील नाही हे स्पष्ट झाले आहे. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ इंदरच्या आगामी सिनेमातील एक सीन आहे. इंदरने आपल्या मृत्यूआधीच या सीनच चित्रिकरण केल होत. पण इंदरच्या मृत्यूनंतर वर्षभरातच हा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना इंदरचा मृत्यू हा हार्ट अटॅकने नाही तर आत्महत्या करुन झाल्याचे वाटतेय. या व्हिडिओला घेऊन इंदरची पत्नी लवकरच एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये ती या व्हायरल व्हिडिओमागच सत्य सांगणार आहे.