अखेर तारीख ठरली पुन्हा India Lockdown; धाकधुक वाढली
इंडिया लॉकडाऊन होणार हे 100% खरं आहे. पण...
मुंबई : २५ मार्च २०२० हा दिवस कोणाला आठवत नाही. या दिवशी भारतात पहिलं लॉकडाऊन लागलं आणि प्रत्येकाचं आयुष्य बदललं. कोरोना या साथीमुळे छोट्या कामगारांपासून ते मोठ मोठ्या बिझनेसमनपर्यंत सगळ्यांनाच घरात कोंडलं. प्रत्येकजण या साथीनंतर खूप काही शिकलं. आता पुन्हा एकदा 'इंडिया लॉकडाऊन' होणार आहे. आता तुमच्या मनातही हाच प्रश्न आला असेल की, कोरोनाची साथ पुन्हा एकदा भारतात आलीये का? तर आम्ही आज तुम्हाला 'इंडिया लॉकडाऊन'बद्दल सांगणार आहोत.
इंडिया लॉकडाऊन होणार हे 100% खरं आहे. पण हा एक सिनेमा आहे. त्यामुळे जर तुम्ही गोंधळला असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, येत्या 2 डिसेंबरला इंडिया लॉकडाऊन नावाचा सिनेमा येतोय. सध्या ट्विटरवर #lockdownindia हा ट्रेंड चर्चेत आहे.
मधुर भांडारकरच्या आगामी 'इंडिया लॉकडाऊन' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर तुम्हाला त्या आठवणींमध्ये ढकलतो ज्या खूप वेदनादायक आहेत. टीझरमध्ये प्रतीक बब्बर, आहाना कुमरा, श्वेता बसू दिसत आहेत. चित्रपटात दु:ख, अडचणी आणि कोरोना यांची सांगड घालण्यात आली आहे.
लॉकडाऊनची सुरुवात
देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन असताना पहिल्या लॉकडाऊनच्या घोषणेपासून टीझरची सुरुवात होते. देशाच्या विविध भागांचं फुटेज घेऊन तुमच्यात वेगवेगळे जीव जोडले जातात. श्वोता बसू एक सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आली आहे जी त्या चिंतेत आहे की हा कोणता आजार आहे जो स्पर्शाने पसरतो.
प्रतीक बब्बर स्थलांतरित कामगार
दुसरीकडे, प्रतीक बब्बर हा स्थलांतरित कामगार म्हणून दाखवण्यात आला आहे जो घरी परतण्यासाठी पायी प्रवास करतो. त्याचं दु:ख, कुटुंब आणि त्या काळात आलेल्या अडचणी या टीझरमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर एक मोलकरीण देखील दाखवली जात आहे जिचं काम कोरोनाने हिरावून घेतलं आहे.
पायलटची कथा
त्याचबरोबर आहाना कुमराला पायलट म्हणून दाखवण्यात आलं आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तो दारूच्या नशेत झोकून देतो. टीझर शेअर करत मधुर भांडारकरने लिहिलं की, तुम्हाला ज्या शोकांतिका माहित आहेत पण ज्या कथा तुम्हाला माहीत नाहीत. हा चित्रपट २ डिसेंबरला Zee5 OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.