`या` तरुणांचं भोलबाबा गाणं ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले `बहुत बढ़िया`!
व्हिडीओमध्ये दोन तरुण कमी वाद्यांमध्ये पण मनोभावे भगवान शंकराचं गाणं गात आहेत
मुंबई: जगात टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडियावर असे रोज व्हिडीओ आपल्याला पहायला मिळतात ज्यात लोक आपलं टॅलेंट शेअर करत असतात. यातील बरेचसे व्हिडीओ असे आहेत की, ते लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि व्हायरल होतात. महाशिवरात्रीआधी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची दखल चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. पीएम मोदी यांनी या व्हिडीओचं भरभरुन कौतुक केलं. त्यांच्या रिट्विटनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दोन गायक भगवान शंकरावर आधारित गाणं गाताना दिसत आहेत. एक गायक तार वाद्य वाजवत आहे तर दुसरा लोक गायक डफली वाजवत आहे. तैमूरच्या मेहुण्याच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी हा व्हिडीओ रिट्वीट करत 'बहुत बढिया'! असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला जवळपास 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 20 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे.
9 मार्च रोजी हा व्हिडीओ पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दोन तरुण कमी वाद्यांमध्ये पण मनोभावे भगवान शंकराचं गाणं गात असल्याचं दिसत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे.
आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक्स दिले आहेत तर 8 हजाराहून अधिक लोकांनी रीट्वीट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे लोकांच्या सतत संपर्कात असतात. त्यांच्या जीवनावर आधारित आणखी एक सिनेमा येणार अशी चर्चा होती. ही चर्चा नसून 'एक और नरेन' सिनेमाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. या सिनेमात गजेंद्र चौहान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'महाभारत' मालिकेत त्यांनी युधिष्ठिराची भूमिका साकारली होती.
चित्रपट दिग्दर्शक मिलन भौमिक यांनी गुरुवारी सांगितले की, 'एक और नरेन' या सिनेमाच्या कथेत दोन कथा दाखवल्या जाणार आहेत. त्यापैकी एक नरेंद्रनाथ दत्तरुपी स्वामी विवेकानंद यांचं जीवन तर दुसरं नरेंद्र मोदी यांच जीवन दाखवलं जाणार आहे. या सिनेमाचं शूटींग १२ मार्च रोजी कोलकत्ता आणि गुजरातमध्ये सुरु होणार आहे. या सिनेमाचं शूट एप्रिल महिन्यात पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी १७ सप्टेंबरला 'एक और नरेन' हा सिनेमा रिलीज होणार आहे.