INDIA वि. भारत : विरोधी पक्षांने आघाडीचं नाव इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लुसिव अलायंस म्हणजे INDIA असं ठेवलं आहे. जेव्हापासून विरोधी आघाडीने हे नाव ठेवलंय तेव्हापासून इंडिया विरुद्ध भारत असा वाद निर्माण झाला आहे. G-20 च्या निमंत्रणपत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' (President of Bharat) असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे इंडियाचं नाव अधिकृतरित्या भारत असं करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं बोललं जात आहे. पण यावर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याचे राजकीय पडसाद उमटले असतानाच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांचं ट्विट
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये 'भारत माता की जय' असं लिहिलं आहे. हे ट्विट तेव्हा समोर आलं आहे जेव्हा संविधानातील INDIA हे नाव बदलून भारत असं करण्याची मागणी पुढे येत आहे. भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्दांचे देशातील राजकारणावर पडसाद उमटले आहेत. अशा प्रसंगी अमिताभ बच्चन यांचं ट्विट आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट वेगाने व्हायरल झालं आहे. ट्विट केल्यानंतर काही मिनिटात 1500 हून अधिका रिट्विट आले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवर हजारोंनी कमेंटस येऊ लागले आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये भारत माता की जय याव्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट लिहिलेली नाही. पण युजर्स याचा संबंध थेट इंडिया आणि भारत नावाच्या चर्चेशी जोडत आहेत. 


G20ची निमंत्रण पत्रिका
दिल्लीमध्ये सध्या सुरु असलेल्या जी-20 समितीच्या बैठकीसाठी राष्ट्रपती भवनामधून परदेशातील पाहुण्यांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली. याआधी निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं छापलेलं असयाचं पण आता प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिण्यात आलं आहे. यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचं नाव बदलण्याचा विचार करत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. संसदेचं विशेष अधिवेशन देशाचं नाव बदलण्यासाठीच बोलावण्यात आल्याचा दावा रमेश यांनी केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यासारख्या नामवंत व्यक्तींनीही अचानक भारत असा उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केल्याने देशाचं नाव बदलण्यासाठीच खरोखर अधिवेशन भरवण्यात आलं आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.