मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान सिनेजगतात एकमेकांना सोशल मीडियवर बहिष्कृत करत आहेत. भारतात पाकिस्तनी कलाकरांना पूर्णपणे बॅन करण्यात आले आहे. टी-सिरीज म्यूझिक कंपनीने पाकिस्तानी गायक अतिफ असलमच्या गाण्याला युट्यूब वरुन काढून टाकण्यात आले आहे. सलमान खानने पाकिस्तानी कलाकार अतिफ असलमला 'नोटबुक' सिनेमातून  काढण्याचे आदेश आपल्या प्रोडक्शन टीमला दिले. त्याचप्रमाणे अभिनेता अजय देवगन निर्मित सिनेमा 'टोटल धमाल' पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियवर भारत vs पाकिस्तान युद्ध सुरू आहे. अजयच्या निर्णययाचे जगभरातून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अजयला चांगलेच ट्रोल केले जात आहे. भारतात एफडब्ल्यूआईसीई ने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मात्यांना पाकिस्तानमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.   



 


 



पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आल्यामुळे देश शोकसागरात बुडाला आहे. संपूर्ण देशात हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल अहमद दारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत पाकिस्तानचा विरोध करण्यात आला सोबतच साऱ्या देशभरातून सीआरपीएफच्या जवानांना आदरांजलीही वाहण्यात आली. या घटनेचे पडसाद जनसामान्यांपासून ते राजकीय, क्रि़डा, कलाविश्वात उमटताना दिसत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड मंडळी फार टोकाचे पाउल उचलताना दिसत आहेत. कलाविश्वात पाकिस्तनी कलाकारांना बॅन करण्याच्या चर्चंना उधान येत आहे.