मुंबई : ख्रिसमसच्या काही दिवस आधीच शाहरुख खानचा 'झिरो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख एका बुटक्या व्यक्तीच्या म्हणजेच 'बऊआ सिंग'च्या भूमिकेत दिसत आहे. त्याचं हे रुप प्रेक्षकांसाठी नवं असलं तरीही किंग खानची जादू काही झिरोला तारू शकलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुखसोबतच या चित्रपटात झळकणाऱ्या कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिकांनी काहींनी प्रशंसा केली. आहे. अपंगत्वं असूनही त्यावर मात करत वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 'आफिया भिंदर'च्या रुपात अनुष्काने फक्त प्रेक्षकांचीच नव्हे तर, पती विराटचंही मन जिंकलं आहे. 


विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्काच्या भूमिकेची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. 'अनुष्काच्या वाट्याला आलेली भूमिका ही जास्त आव्हानात्मक होती आणि तिने ती अतिशय सुरेखपणे निभावली आहे', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं होतं. 


त्याच्या या ट्विटनंतर 'झिरो' न भावलेल्या चाहत्यांनी उपरोधिक ट्विट करत त्याची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. कोणी चित्रपटाच्या तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी मन्नत या शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केल्याचा एक प्रतिकात्मक फोटो पोस्ट केला, तर कोणी झिरो किती वाईट आहे, याविषयी लिहीत विराटला धारेवर धरलं. त्यामुळे पत्नीची प्रशंसा करणं नौरोबा विराटला महागात पडलं, असंच म्हणावं लागेल. 






शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाकजून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. पण, समीक्षक आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात 'झिरो' अपयशी ठरला आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची खिल्ली उडवण्याच्या सत्रास सुरुवात झाली.