मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही जोडी 'मोस्ट हॅपनिंग कपल्स'च्या यादीत अग्रस्थानी येते. कला आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये या दोघांच्याही नावाची चर्चा अनेकदा पाहायला मिळते. रिलेशनशिपपासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासात आजवर विरुष्कानं कायमच सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी ही स्टार जोडी सध्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. या व्हिडीओच्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे अनुष्काच्या सौंदर्यांनं घायाळ झालेला विराट. पत्नी अनुष्का हिचं रुप पाहून विराटनं थेट तिच्यासाठी गाणंच गायलं आहे. 'ये चाँद सा रोशन चेहरा... ' हे गाणं म्हणताना विराटचा अंदाज आणि अनुष्काप्रती असणारं त्याचं प्रेम अतिसय सुरेखरित्या व्यक्त होताना दिसत आहे. 



एका जाहिरातीच्या निमित्तानं हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. अनुष्कानंच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. फक्त गाणंच नव्हे, तर विराट या व्हिडीओमध्ये चक्क अनुष्कासोबत ठेकाही धरताना दिसत आहे. अनुष्काचं सौंदर्य पाहून कोणीही तिच्या रुपावर घायाळ होईल तर मग विराटही याला अपवाद नाही हेच खरं, नव्हे का?