मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कलाविश्वात देखील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या महामारीचे पडसाद इंडियन आयडलच्या मंचावर देखील पाहायला मिळाले. होस्ट आदित्य नारायणला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता इंडियन आयडलचा स्पर्धक पवनदीपला देखील कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती पाहाता इंडियन आयडलच्या सेटवर देखील कोरोना व्हायरसे एन्ट्री केली आहे. पवनदीप कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे निर्मात्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 



कोरोना होवून देखील पवनदीपने त्याचा हटके अंदाजात व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून परफॉर्म केलं. त्यामुळे त्याच्या जिद्दीचं आणि  गाण्याबद्दल असलेल्या प्रेमाचं कौतुक होच आहे. पवनदीपने त्याच्या गोड आवाजाने सर्वांच्याच मनात घर केलं आहे.  सध्या त्याचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


दरम्यान पवनदीपला कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागण्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती पॉझिटीव्ह आली आहे. आदित्य पाठोपाठ पवनदीपला कोरोना झाल्यामुळे बाकी स्पर्धाकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.