Indian idol : शनमुख प्रियाला विजय देवरकोंडाकडून मोठी ऑफर
रियालिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवल्यानंतर आता शनमुख प्रिया साऊथ इंडस्ट्रीपर्यंत पोहोचली आहे.
मुंबई : इंडियन आयडॉल 12 फेम शनमुख प्रियाला साऊथ स्टार विजय देवरकोंडाकडून मोठी ऑफर मिळाली आहे. रियालिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवल्यानंतर आता शनमुख प्रिया साऊथ इंडस्ट्रीपर्यंत पोहोचली आहे. तिची ओळख आता मोठ-मोठ्या सेलिब्रिटींना ही झाली आहे.
शनमुख प्रियाला विजय देवरकोंडाच्या आगामी 'लिगर' साठी एक गाणे गाणार आहे.
साऊथ इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेते विजय देवरकोंडाने इंडियन आयडॉल 12 ची स्पर्धक शनमुख प्रियाला दिलेले वचन पूर्ण केले आहे. सध्या विजय देवरकोंडा धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'लाइगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इंडियन आयडॉल 12 च्या दरम्यान विजयने शानमुख प्रियाला वचन दिले होते की अभिनेता तिला तिच्या चित्रपटासाठी साईन करेल आणि त्याने ते वचन पाळले.
विजय देवरकोंडा हे साऊथ मधील मोठं नाव आहे. विजयचं खूप मोठं फॅन फॉलोविंग आहे. तरुणाईला आपल्या दमदार अभिनयाने प्रेमात पाडणारा विजय देवरकोंडा आता बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहे. याच सिनेमासाठी इंडियन आयडॉल फेम शनमुख प्रिया आपल्या आवाजात गाणं गाणार आहे.