मुंबई : आपला समाज स्त्रीयांना फारशी मोकळीक देत नाही. तरीसुद्धा भारतीय महिला आव्हानांचा सामना करण्यास घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने दिली आहे. ती 'पद्मावती' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांशी बोलताना मानुषी म्हणाली की, 'सर्व भारतीय महिलांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे आम्ही आव्हानांचा सामना करायला घाबरत नाही. मला वाटते आम्हाला स्वत:वर विश्वास असणे महत्त्वाचे.' दरम्यान, पद्मावती वादावरून अभिनेत्री दिपीका पदुकोनला मिळालेल्या धमक्यांबाबत विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. अनेकदा असे वाटते की आपला समाज स्त्रियांबाबत तितका मोकळेपणा स्विकारत नाही. पण, एक व्यक्ती म्हणून आपल्याला महिलांमध्ये आत्मविस्वास जागृत करण्यासाठी काम करावेच लागेल.


महत्त्वाचे असे की, मानुषी छिल्लरने विश्वसुंदरी स्पर्धेत संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला रामलीला' चित्रपटातील 'ढोल बाजे' गाण्यावर डान्स केला होता.


दरम्यान, 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.  नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत बिहारमधील सर्व पक्ष मान्यता देत नाहीत तोपर्यंत 'पद्मावती'वर बिहारमध्ये बंदीच राहील. बिहारचे क्रिडामंत्री कृष्ण कुमार ऋषी यांनी म्हटले आहे की, चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये जोपर्यंत हटवली जात नाहीत तोपर्यंत राज्यात चित्रपट प्रदर्शीत होऊ दिला जाणार नाही.