रिअॅलिटी शोमध्ये `उल्टी` विकायला आला माणूस; Video पाहून तुम्हालाही वाटेल किळस
एका स्पर्धकानं तर कहरच केला.
मुंबई : 'इंडियाज गॉट टॅलेंट'(India's Got Talent 9)या रिअॅलिटी शो च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी या कार्यक्रमात येत आहेत. काही कलाकारांचे कलागुण पाहून परीक्षकही थक्क होत आहेत.
चौकटीबाहेरचा आपल्या गुणांना वाव देत राष्ट्रीय वाहिनीवर ते सादर करण्यासाठीच इथं प्रत्येकजण येत आहे.
बरं, वाहिनीकडून आणि कार्यक्रमाच्या परीक्षकांकडून अशा मंडळींना उत्सफूर्त असा प्रतिसादही दिला जातोय.
येणारा प्रत्येक स्पर्धक काहीतरी नवं सादर करताना दिसत आहे. पण, या नव्याच्या भानगडीत आता एका स्पर्धकानं तर कहरच केला.
कार्यक्रमाच्या प्रोमोत याची झलक पाहायला मिळत आहे. जिथं एम जे गोलावाला नावाचा एक व्यक्ती बर्फाच्या गोळ्याची हातगाडी घेऊन मंचावर आला.
एका गोळ्याची किंमत 200 रुपये असल्याचं त्यानं सांगताच तिथं परीक्षकांमध्ये असणारा गायक बादशाहासुद्धा हादरला.
पुढे, आपण गोळ्याचं पाणी वेगळ्या पद्धतीनं तयार करतो असं सांगत त्यानं जे केलं ते पाहून परीक्षकच नव्हे तर नेटकऱ्यांनाही किळस वाटला.
या व्यक्तीनं तिथं सरबत, पाणी पिऊन हे सर्व उल्टीवाटे बाहेर काढलं आणि ते एका भांड्याचत गोळा केलं.
ऐकूनच कसंतरी होतंय ना, तिथे असणाऱ्यांनी तर हे प्रत्यक्ष पाहिलं. परीक्षकांमध्ये असणाऱ्या किरण खेर यांनी यावेळी स्पर्धकावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कलागुण असावेत, पण हे असे.... एका वाहिनीवर ज्यावेळी आपण स्वत:ला सादर करत असतो तेव्हा काही गोष्टींचं भान बाळगलं पाहिजे, हेच हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतंय.