इंडस्ट्री खूप वाईट आहे-अभिषेक बच्चन
इथे सगळे काही कमवावे लागते. दुःख जास्त वाट्याला येते
मुंबई:करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये अनेक सिने स्टार उपस्थित राहतात. नुकताच शो मध्ये बच्चन भावंडांनी हजेरी लावली.शोमध्ये अनेक किस्स्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अभिषेक आपल्या करिअर बद्दल बोलला. त्याने करिअर विषयी खंत व्यक्त केली. कोण्या दुसऱ्याला मुख्य भूमिका मिळते आणि आपल्या साईड हिरोच्या रोल साठी विचरण्यात येते. हे खूप वेदनादायी आहे. साईड हिरोचा रोल करणे हे एका कलाकारासाठी वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे. ही इंडस्ट्रीचं खूप वाईट आहे. इथे सगळे काही कमवावे लागते. दुःख जास्त वाट्याला येते असे अभिनेता अभिषेक बच्चन म्हणाला.सुमारे दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मधून वापसी केली होती. तेव्हाअभिषेकच्या अभिनयाचे फार कौतुक झाले. पण याचा हवा तसा प्रभाव अभिषेकच्या करिअरवर पडला नाही.सिनेमात विकी कौशल आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर अभिषेकच्या करिअरला उतरता क्रम लागला.अभिषेकने या सगळ्यांबद्दलचे दु:ख कॉफी विथ करण शो मध्य़े बोलून दाखवले आहे.
सध्या अभिषेक ‘लाईफ इन अ मेट्रो’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे.याशिवाय ‘हाऊसफुल 4’मध्येही तो झळकणार आहे. अभिषेकने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपट दिले होते. अभिषेक करिअर रुळावर आणण्यासाठी ऐश्वर्याने सलमानची एक्स मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची निवड केली असल्याची चर्चा होती. मध्यंतरी अभिषेकने चार सिनेमे साईन केल्याचीही चर्चा होती.पण ही अफवा असल्याचे समोर आले.