मुंबई : 'इंडियन प्रो म्युझिक लीग'च्या ग्रँड प्रीमियर भागाचं शूट काही महिन्यांपूर्वी पार पडलं होतं. ज्यात सलमान खान, साजिद खान, मिका सिंघ, जावेद अली, नेहा भसीन, शान, कैलाश खेर याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक नामांकित चेहरेदेखील यांत होते. या शूट दरम्यान प्रत्येकाने एकमेकांबद्दल काही रंजक किस्से शेअर केले. मीका सिंघने एक किस्सा सांगितले तो म्हणाला, सलमान सर्वात मोठा खोडकर आहे यावंर साजिद खान म्हणाला की, सलमानने आपल्या नातेवाईकांच्या लग्नात एका काकांकडून 'दबंग' चित्रपटाची हुक स्टेप चोरली होती. जी आज खुप फेमस आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबंग' चित्रपटाच्या हुक स्टेपचं रहस्य साजिदने उघड केलं.
दिल्ली जॅमर्सचा कॅप्टन साजिद खान म्हणाला, "सलमान, मी आणि आमचे काही मित्र एका नातेवाईकांच्या लग्नाला गेलो होतो. तिथे आम्ही पहिल्यांदाच बाराती म्हणून एकत्र आलो होतो.


तिथे आम्ही बारातमध्ये रस्त्यावर नाचत होतो आणि त्यावेळी तिथे बरीच गर्दीही जमली होती, या गर्दीला हटवण्यासाठी वरातमधील एका काकांनी एक पाऊल पुढे उचललं, ज्यामध्ये ते मनगट फिरवू लागले.


यानंतर आम्ही अजून एका दुसऱ्या काकांना पाहिलं ते  काका कंबरेचा पट्टा हलवून डान्स करत होते. हे पाहून सलमान भाईंनी लगेच या दोन्ही काकांना सांगितलं, ''काका तुमच्या दोघांच्याही डान्स स्टेप मी आता चोरणार आहे.  


यानंतर सलमानने या दोन स्टेप एकत्र केल्या आणि दबंग सिनेमांत एक प्रसिद्ध हुक स्टेप केली. तर दुसरीकडे हे दोन्ही काका आजही असं म्हणत आहेत की, सलमानने आमच्या स्टेप चोरल्या."