मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, 'इकबाल' या चित्रपटाचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांनी मला विवाह रद्द कर अशी मागणी केली होती. , कारण इकबाल चित्रपटात श्रेयसची भूमिका होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागेशने श्रेयसला त्याचं लग्न 'रद्द' करायला सांगितलं
चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या तीन दिवस आधी श्रेयसने सुट्टी मागितली. त्यावेळी नागेशला वाटलं की तो पार्टीला जात आहे. पण जेव्हा श्रेयसने त्यांना सांगितलं की, त्या दिवशी त्याचं लग्न होणार आहे, तेव्हा नागेश यांनी श्रेयसला लग्न 'रद्द' करायला सांगितलं.


नंतर नागेशने श्रेयसला दिली एक दिवसाची सुट्टी
श्रेयसने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी एक मध्यमवर्गीय घरातला मुलगा होतो. जिथे मी माझ्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या होत्या आणि नागेश मला लग्न रद्द कर असं सांगत होते. मला काय करावं हे कळत नव्हतं. त्यानंतर मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. मी त्यांना म्हणालो की, मी या लग्नाची गुप्तता ठेवीन. मग त्यांनी मला एक दिवसाची सुट्टी दिली."


चित्रपटाच्या प्रीमियरला त्याची पत्नी नागेशची बहीण म्हणून गेली होती
नागेश म्हणाले की, इकबालमध्ये जो टीनएजरची भूमिका साकारणार तो खऱ्या आयुष्यात विवाहित पुरुष होऊ शकत नाही. श्रेयस म्हणाला की, चित्रपटाच्या प्रमोशन दौर्‍यादरम्यान तो आपल्या लग्नाबद्दल कधीच काहीच बोलल नाही आणि जेव्हा जेव्हा त्याची पत्नी दीप्ती म्हणाली की तिला चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये जायचं आहे, तेव्हा ती नागेशची बहीण म्हणून गेली होती.


सुभाष घई यांनाही लग्नावर विश्वास नव्हता
निर्माते सुभाष घई यांना श्रेयसच्या लग्नाबद्दल माहिती नव्हती. "जेव्हा सुभाषजींनी त्यांना बर्‍याचदा स्क्रिनिंगमध्ये या दोघांना एकत्र पाहिलं, तेव्हा त्यांनी चौकशी केली. नागेश यांनी त्यांना सांगितलं की, ती श्रेयसची पत्नी आहे. त्यांनी श्रेयसचं लग्न झालं असल्याचं मानण्यास नकार दिला.