मुंबई : अनेकदा चित्रपटांमध्ये अशी काही दृश्य साकारण्यात येतात जी खऱ्या अर्थानं दिग्दर्शक आणि कलाकारांचं कसब पाहतात. इंटिमेट दृश्य, बोल्ड सीन किंवा मग Sex Scene शब्द काहीही असले तरीही ही दृश्य साकारण्यासाठी समोर येणारी आव्हानं एकसारखीच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक प्रेक्षक म्हणून पाहता हे सारंकाही अगदी सोपं वाटतं. पण, ते साकारण्यामागं लागलेली मेहनत मात्र नजरेआडच जाते. 


चित्रपटांच्या भाषेत सांगावं तर, हुकअप सीनचं दिग्दर्शन सोपं नाही. या क्षेत्रात न्यूयॉर्क बेस्ड कोरिओग्राफर Tricia Brouk बरीच नावाजली आहे. 


ती स्वत:च्या पार्टनरसोबत असे सीन आधी साकारून दाखवते त्यानंतर पुढील चित्रीकरण होतं. 


दोन कलाकार एकमेकांशी सहजपणे वावरु लागल्यानंतर अशा दृश्यांचं चित्रीकरण केलं जातं. 


बऱ्याच कलाकारांना न्यूड सीनसाठीही अडचणी येतात. अशा वेळी काही उपकरणं आणि साधनांच्या मदतीनं कलाकारांचे प्रायव्हेट पार्ट झाकून न्यूड सीन देण्यात येतो. 


अभिनेत्रींना मासिक पाळी आलेली असतानाही अशा दृश्यांचं चित्रीकरण करावं लागतं. ज्यामुळे त्यांना अशा परिस्थितीतही चित्रीकरणासाठी सज्ज रहावं लागतं. 


सेक्स सीनदरम्यान अभिनेत्रींना लँडिंग स्ट्रीप किंवा त्यासारखी वस्तू दिली जाते. डबल टेप किंवा बिकीनी बाईट नावाच्या गोष्टीनं ही चिकटवली जाते. 


काही वेळा तर, अशा दृश्यांसाठी अभिनेत्रांच्या गुडघ्यांनाही दुखापत झाली असल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना तर फ्रॅक्चरही आलं आहे. 


सरतेशेवटी अशा सीनसाठी बॉडी डबलचा वापर केला जातो. 


भावना अनावर होताच... 
सेक्स सीन चित्रीकरणादरम्यान, कलाकार एकमेकांशी बऱ्याच गोष्टींवर संवाद साधतात. अनेकदा कलाकारांना चित्रीकरणादरम्यानच Erections होतात. 


पण, अशा वेळी समोरच्या अभिनेता अथवा अभिनेत्रीला चुकीचं वाटू नये याचं स्पष्टीकरण अनेकदा चित्रीकरणापूर्वीच दिलेलं असतं. 


शरीरभर मेकअप 
अनेकदा ही दृश्य अधिक प्रभावी दाखवण्यासाठी मेकअपचा वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी अभिनेता आणि अभिनेत्रीला घाम आलेला दाखवायचं झाल्यास वॅसलिन, तेल, पाणी अशा मिश्रणाचा वापर केला जातो. 


अथवा अल्ट्रा स्वेट बॉडी जेलचाही वापर केला जातो. 



दिग्दर्शकानं 'कट' म्हणताच...
कथानकाच्या गरजेपोटी कलाकारांना कॅमेरासमोर अशी दृश्य साकारावी लागतात. अर्थात हा झाला त्यांचा कामाचा भाग. 


पण, सीन पूर्ण होताच दिग्दर्शकानं 'कट' अशी कमांड देताच लगेच कॉस्च्यूम किंवा इतर विभागातील मंडळी बार्थरोब आणत कलाकारांना तातडीनं देतात.