Ira Khan Smoking: स्वत:च्या लग्नात सिगारेट ओढताना दिसली आमिर खानची लेक!
सध्या लग्नाचा सीझन सुरुये. एकीकडे अनेकजण लग्नबंधनात अडकत असताना अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत सपार पडला. 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत आयराने लग्नगाठ बांधली.
मुंबई : सध्या लग्नाचा सीझन सुरुये. एकीकडे अनेकजण लग्नबंधनात अडकत असताना अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत सपार पडला. 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत आयराने लग्नगाठ बांधली. या दोघांचं उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग आणि मुंबईत भव्य रिसेप्शन पार पडलं. आयरा तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहे.
आता आयराने प्री-वेडिंग फंक्शनची झलक शेअर केली आहे. यावेळी तिने नुपूर शिखरे, कुटुंब आणि मित्रांसोबतचे काही खास क्षण शेअर केले आहेत. मात्र आयराने शेअर केलेल्या फोटोपैकी शेवटचा फोटो पाहून चाहत्यांना थोडं विचित्र वाटलं. हा फोटो पाहताच आयरा चांगलीच ट्रोल झाली आहे. तिचा शेवटचा फोटो लोकांना आवडला नाही, खरंतर या फोटोद्वारे तिने एका नव्या वादाला जन्म दिला आहे.
आयराने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोत आयरा सिगारेट ओढताना दिसत आहे. समोर आलेल्या एका फोटोत आयरा, झोपलेली दिसत आहे. तर एका फोटोमध्ये आयरा झोपताना दिसत आहे. तर एका फोटोत आयरा डोळ्यांवर मास्क लावून आराम करताना दिसत आहे. याचबरोबर आयराने तिची आई रीना दत्तसोबत आणि पती नुपूर शिखरेसोबतही पोजही दिल्या आहेत. मात्र आयराच्या सिगारेट फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहीलं, हा फोटो अजिबात चांगला नाही. तर अजून एकाने लिहीलंय, 'आमिर खानची मुलगी असल्याने तु सिगारेटचा प्रचार करत आहेस. तर अजून एकाने लिीहलंय, लोकं यासाठी तुम्हाला फॉलो नाही करत तर तुमच्या चांगल्या सवयींसाठी तुम्हाला फॉलो करतात आणि तुम्ही तुमची इमेज खराब करत आहात.'' अनेक युजर्स अशी नशा आणि सिगारेटला प्रोत्साहन देऊ नका असं सांगितंलय
३ जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. तर 10 जानेवारी रोजी, उदयपूरमध्ये, कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत, त्यांनी ख्रिच्छन पद्धीतीने लग्न केलं.आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यात मेहंदी, संगीत समारंभ, फुटबॉल सामना आणि पायजमा पार्टीचा समावेश होता. लग्नानंतर नूपुरने सुंदर फोटो शेअर केले. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. या जोडप्याने 13 जानेवारी रोजी मुंबईत स्टार-स्टेटेड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केलं होतं आणि आयरा आणि नुपूरचे लग्न सेलिब्रेशन करण्यासाठी बॉलिवूडचे मोठे सेलिब्रिटी उपस्थित होते.त्याचबरोबर आता आयराने काही फोटोही शेअर केले आहेत.