मुंबई : आमिर खानची मुलगी आयरा खानने 8 मे रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला आहे. यासंदर्भातील अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. वाढदिवशी आयरा मित्र-मैत्रीणींसह आपल्या कुटुंबासोबत देखील वेळ घालवताना दिसली. आयराची बर्थडे पार्टी स्विमिंगपूलमध्ये जोरदार सुरु होती. यामध्ये आयरा आपला बॉयफ्रेंड नुपुरसोबत देखील वेळ घालवताना दिसली. आयराने बिकिनीमध्येच आपल्या वाढदिवसाचा केक कापला, तसेच तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामुळे हा फोटो चर्चेचा विषय ठरला. एवढेच काय तर आयरा ट्रोल देखील झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयरा खानने तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या बर्थडे पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत, आयरा केक कापण्यापूर्वी मेणबत्त्या विझवताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती एका रेस्टॉरंटमध्ये आहे. 


इतर फोटोंमध्ये, आयरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत बिकिनी घालून पूलमध्ये खूप रोमँटिक होताना दिसत आहे. एवढंच काय तर एका फोटोमध्ये आयरा आपली दुसरी आई म्हणजे आमीरची दुसरी बायको किरण रावसोबत पूलमध्ये दिसत आहे.


तर एका फोटोमध्ये आयरा ही वडील आमीर खान, तिचा सावत्र भाऊ आझाद आणि आई रीना दत्तासह दिसत आहे.



व्हायरल होणाऱ्या या फोटोमुळे आयरा ट्रोल झाली असली तरी, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आयराच्या वाढदिवसानिमित्त का होईना त्यांचं संपूर्ण परिवार एकत्र आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.


आमीर खानने रीना दत्ताला घटस्फोट दिल्यानंतर किरण रावसोबत लग्न केलं होतं. परंतु काही महिन्यांपूर्वी आमीर आणि किरणने देखील एकमेकांपासून वेगळं होण्याचं निर्णय घेतला होता आणि ते वेगळे देखील झाले. परंतु तरी देखील आयराच्या या महत्वाच्या दिवशी तिला आनंद वाटावं किंवा बरं वाटावं म्हणून आमीर खानचं संपूर्ण कुटुंब एकमेकांसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.