Ira Khan Nupur Shikhare Engagement: बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खान (Ira Khan)  ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. आमिर खानची लेक गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. त्यातून तिच्या लव्ह अफेअरमुळे तिची सोशल मीडियावर रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चा होतंच असते. आपल्या बॉयफ्रेंडसोबत (Boyfriend) इन्टाग्रामवर वेकेशनपासून (Vacation) डेटिंगपर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ ती इन्टाग्रामवर शेअर करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आमिर खानची लाडकी इरा खान गेल्या दोन वर्षांपासून फिटनेस ट्रेनर (Fitness trainer) नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करत होती आणि आता दोघांनीही त्यांच्या नात्याला एक नाव दिले आहे. इरा आणि नुपूर  शिखरे या दोघांनीही शुक्रवारी मुंबईत साखरपूडा पार पाडला. कुटुंबाच्या आणि अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत दोघांनी साखरपुडा (Engagement) केला आणि आता या खास प्रसंगाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


 


हे ही वाचा - Bollywood Gossip: 'या' अभिनेत्री लग्नाआधीच होत्या Pregnant, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का


 



इरा ऑफ शोल्डर गाउनमध्ये सुंदर दिसतेय


इरा खान आणि तिच्या होणार्‍या वराच्या एंगेजमेंटनंतरचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहेत, ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. तिच्या आयुष्यातील या खास प्रसंगी, इरा एका लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. इरा ऑफ-शोल्डर गाउनमध्ये ग्लॅमरस (glamorous) दिसत होती, तर नुपूर शिखरे देखील टक्सिडो परिधान केलेल्या देखणा दिसत होता. समारंभातून बाहेर पडताना पापाराझींनी (Paparazzi) त्यांची छायाचित्रे आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.


 




लॉकडाऊनमध्ये प्रेमकहाणी सुरू


इरा खान आणि नुपूर शिखरे यांच्यातील नात्याची सुरुवात 2020 मध्ये झाली. नुपूर हा स्टारकिडचा जिम (Gym) ट्रेनर होता. नुपूर शिखरेनेही आमिर खानला प्रशिक्षण दिल्याचे बोलले जाते. लॉकडाऊन दरम्यान दोघांची जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. इरा आणि नुपूरने त्याच वेळी इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यांचे नाते अधिकृत केले होते. सप्टेंबर 2022 रोजी नुपूरने त्याच्या एका स्पर्धेनंतर इरा खानला सगळ्यांसमोर प्रपोज (Propose) केले. यानंतर आता दोघांनी घरच्यांच्या उपस्थितीत साखरपूडा केला आहे. आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.