मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान अभिनेत्री नसली तरी तिच्या बद्दल चर्चा मात्र जोरदार रंगलेल्या असतात. रंगणाऱ्या  चर्चांना  कारण देखील तसचं आहे. इरा कायम  तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो  तर कधी व्हिडिओ पोस्ट करत असते. इराने पोस्ट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत असतात. आता देखील इराने बॉफ्रेंडसोबत बॉक्सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. सराव करत असतानाचा हा व्हिडिओ इराच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये बॉयफ्रेंड नूपुर इराला बॉक्सिंगचे धडे देत आहे. त्याचप्रामाणे इरा देखील  नूपुर दिलेल्या सुचनांचे पालन करताना दिसत आहे. पण मध्ये काही होतं इरा नूपुरला मिठी मारते. सांगायचं झालं तर इरा खानने फेब्रुवारी 2021रोजी बॉयफ्रेंड नूपुर शिखारेसोबत असलेल्या तिच्या नात्याला दुजोरा दिला. दोघे लव्हबर्ड्स कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेमही मिळतं. 


कोण आहे नूपुर शिखारे ?
नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.