मुंबई : आमिर खानची मुलगी सध्या प्रेमात आहे. आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिप एन्जॉय करत आहे, त्यामुळे आयराने हा प्रेमाचा दिवस खास पद्धतीने साजरा केला. आयरा खानने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिच्या प्रियकरासोबतचा एक खास फोटो शेअर केला आणि त्याला या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये आयरा खान नुपूर शिखरेच्या डोक्यावर डोके ठेवून झोपली आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले - एकत्र दुपारी झोपणारे जोडपे एकत्र राहतात. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.


आयरा खान बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेकदा ती तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.




अलीकडे ती तिच्या साडी कलेक्शनमुळे खूप चर्चेत होती. कधी आई तर कधी आजीच्या साडीत आयराचा लूक चर्चेत राहिला आहे.