आयराला आईच्या साडीत पाहून बॉयफ्रेंड झाला रोमाँटिक, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
आयराला आईच्या साडीत पाहून बॉयफ्रेंड झाला घायाळ...
मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान कायम तिच्या सोशल पोस्ट आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. आता देखील ती एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये असणारी आयरा फोटोमध्ये साडीत दिसत आहे. आयराला साडी नेसायला देखील फार आवडतं. आयराला साडीमध्ये पाहून बॉयफ्रेंड नुपूर शिखरे रोमाँटिक झाला आहे. सध्या तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा आहे.
आयराने नेसलेली साडी नुपूरच्या आईची आहे. खुद्द आयराने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'मला साडी नेसायला फार आवडतं...' असं लिहिलं. सध्या तिचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयराने एका पोस्टमध्ये सांगितलं की, 'ती दर रविवारी काही तासांसाठी साडी नेसते.' आता आयराने बॉयफ्रेंड नुपूर शिखरच्या आईची साडी घातली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
कोण आहे नूपुर शिखरे ?
नुपूर शिखरे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नुपूर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.