आयरा खानकडून बॉयफ्रेंड नुपूर शिक्रेच्या आईला खास पद्धतीने शुभेच्छा
आमिर खानची मुलगी इरा खानने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिक्रेची आई प्रीतम यांचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिक्रेची आई प्रीतम यांचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. इराने प्रीतम शिक्रेच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो पोस्ट केला. ईराने आई-मुलाच्या जोडीचा एक फोटो शेअर केला आणि दोघांच्याभोवती हार्ट ईमोजी तयार केला आहे.
नुपूर आणि प्रीतम फोटोत हसताना दिसतात. गुलाबी ड्रेसमध्ये प्रीतमने सॅश घातला होता, ज्यावर 'बर्थडे गर्ल' लिहिलेलं आहे. तिने लिहिलं की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..मी तुझ्यावर प्रेम करते. याचबोरबर #आई #वाढदिवस." हे हॅशटॅग देखील दिले आहेत.
आयरा आणि नुपूर यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. व्हॅलेंटाईन वीक मध्ये 'प्रॉमिस डे'च्या निमित्ताने इराने नुपूरसोबत अनेक फोटो शेअर केले आणि म्हणाली, "तुझ्यासोबत असणं आणि तुझ्यावर प्रेम करणं हा एक सन्मान आहे .. माझ्या स्वप्नातील राजकुमार."
एकत्र फोटो शेअर केले
आयरा आणि नुपूर बऱ्याचदा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर प्रेमाने भरलेले फोटो शेअर करतात, गेल्या महिन्यात आयराने नुपूरसोबत अनेक फोटो पोस्ट केले आणि लिहिलं, "ये कितना ड्रामेबाज है!"
नाटकाचं दिग्दर्शन
फिल्मी दुनियेत असूनही इरा खान फिल्म इंडस्ट्रीपासून खूप दूर आहे. पण तिने काही वर्षांपूर्वी नाट्य दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. तिने हेझल कीचसह युरीपीड्स मेडिया नाटकाचे दिग्दर्शन केलं. ती आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. तिला एक भाऊ जुनैद देखील आहे, जो अभिनेता होण्यासाठी मेहनत घेत आहे.