मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला डेट करत आहे. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. आता देखील आयरा आणि नुपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपूर एका रेस्टॉरंटमध्ये जात आहेत. यावेळी जमलेल्या सर्वांची नजर फक्त आयरा आणि नुपूरवर आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नव्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.



कोण आहे नुपूर शिखरे
नुपूर शिखर एक फिटनेस ट्रेनर आहे, तो आयरा खानला ट्रेनिंग देत आहे. नुपूर अभिनेता आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर असल्याचं बोललं जात आहे. लॉकडाऊन दरम्यान आयरा आणि नुपूरने एकमेकांना डेटिंग करायला सुरूवात केली. आयरा आणि नुपूरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.