मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली आहे. फक्त आपल्या अभिनयाच्या आणि चिकाटीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले आधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार भारतात परतला आहे. इरफान मायदेशी परतल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या आजारामूळे तो चंदेरी दुनियेपासून फार काळ दूर होता. मंगळवारी तो कर्करोगावर मात करत भारतात परतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारा अभिनेता इरफान खानला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. ५२ वर्षीय अभिनेता इरफान मागील १० महिन्यांपासून लंडनमध्ये  न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर आजारावर उपचार घेत होता. इरफान खानची परिस्थिती स्थिर असल्याची चर्चा मगील काही दिवसांपासून रंगत होती. 


लवकरच इरफान खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इरफान खान लवकरच 'हिंदी मीडियम 2' चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक आणि निर्माते तिगमांशु धूलिया यांनी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम चालू आहे. २०१८ मध्ये इरफानचा 'कारवां' चित्रपट प्रदर्शित झाला होता.