या अभिनेत्याला झाला गंभीर आजार, प्रार्थना करण्यासाठी केली विनंती
अभिनेता इरफान खान याला कोणत्यातरी आजाराने ग्रासलं असल्याची भीती आहे. त्याने याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
मुंबई : अभिनेता इरफान खान याला कोणत्यातरी आजाराने ग्रासलं असल्याची भीती आहे. त्याने याची माहिती ट्विटरवर दिली आहे.
इरफानने ट्विट केलं आहे की, 'कधी-कधी तुम्हाला असे झटके लागतात जे तुम्हाला धक्के देतात. माझ्या जीवनात मागचे १५ दिवस एका सस्पेंस स्टोरी सारखे होते. मला हे माहिती नव्हतं की ही दुर्लभ स्टोरी एका दुर्लभ आजारापर्यंत पोहोचवेल. मी कधी पराभव नाही स्विकारला. आपल्या पंसतीसाठी लढत राहिलो आहे आणि नेहमी लढत राहिल. माझा परिवार आणि मित्र माझ्या सोबत आहे. आम्ही सगळे याचा सामना करतोय. तोपर्यंत तुम्ही काहीही अंदाज लावू नका. ८ ते १० दिवसात रिपोर्ट्स येतील तेव्हा मी स्वत: माझी कथा सांगेल. तोपर्यंत माझासाठी प्रार्थना करा.'
मागील काही दिवसांपासून इरफान खान आजारी आहे. त्याने त्याची शूटींग देखील रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कावीळ झाल्याची बातमी आली होती. पण आता त्यांने त्याच्या चाहत्यांची चिंता आणखी वाढवली आहे. पण त्याने त्याच्या आजाराविषयी काहीही माहिती नाही दिली.