कॅन्सरवर उपचार सुरू असताना इरफान खानची पहिली भावनिक प्रतिक्रिया
अभिनेता इरफान खान गेले काही महिने न्यूरोएंडोक्राइन ट्युमरशी लढा देत आहे.
लंडन : अभिनेता इरफान खान गेले काही महिने न्यूरोएंडोक्राइन ट्युमरशी लढा देत आहे. लंडनमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका दुर्मिळ आजाराशी लढा देतानाही पुन्हा जिद्दीने सिनेसृष्टीत परतण्याची त्याची इच्छा कायम आहे. नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये इरफानने त्याच्या मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत.
'कारवा'चं प्रमोशन
इरफान खानचा आगामी 'कारवा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत आणि कॅन्सरशी सामना करताना त्याच्या मनात सुरू असलेले विचार एका खास पत्राद्वारे त्याने शेअर केले आहेत. इरफान खान झुंजत असलेला 'न्युरो एन्डोक्राईन ट्युमर' म्हणजे काय?
काय म्हणाला इरफान खान ?
'काही दिवसांपूर्वी न्यूरोएन्डोक्राइन ट्युमर या आजाराचे मला निदान झाले. त्यानंतर हा आजार दुर्मिळ असून त्याबाबत पुरेशी माहिती आणि उपचारदेखील नाही.'असे इरफान म्हणाला.
इरफानच्या त्याच्या आयुष्यातील सद्यस्थितीबाबत भावना व्यक्त करताना म्हणाला , ' मी एका जलद लोकलमध्ये स्वार होतो. माझी खूप स्वप्न, आशा,अपेक्षा होत्या. अचानक मला कोणीतरी तुझी गाडीतून उतरायची वेळ झाली आहे. असे सांगितले.
मुलासाठी खास संदेश
इरफानने त्याच्या मुलाला उद्देशून या उपचारातून बाहेर पडून मला लवकरच पुन्हा माझ्या पायावर उभं रहायचं आहे. या आजाराबद्दलची भीती आणि वेदना यातून मला लवकर बाहेर पडायचं आहे. या आजाराचे उपचार अत्यंत वेदनादायी आहेत.
कसा आहे इरफान खान ?
इरफान सध्या ज्या रूग्णालयात आहे त्याचे वर्णनही पत्रामध्ये केले आहे. माझ्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये बाल्कनीदेखील आहे. रस्त्याच्या एका बाजूला हॉस्पिटल तर दुसर्या बाजूला लॉर्ड्स स्टेडियम आहे. तेथे विवियन रिचर्डसच्या हसर्या फोटोचे एक पोस्टर आहे.
चाहत्यांचे आभार !
इरफानच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी याकरिता त्याच्या परिचयातील आणि चाहत्यांमधील अनेक मंडळी प्रार्थना करत आहेत. त्यामुळे या सार्या एकत्र होऊन माझ्या प्रकृतीमध्ये सकारात्मक सुधारणा होत असल्याचे इरफानने सांगितले आहे.