मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan)च्या निधनानंतर आता त्याचा मुलगा बाबिल वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयात आपलं नशिब आजमावणार आहे. बाबिल लवकरच 'काला' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे बाबिल त्यांच्या वडिलांसारखा अभिनेता म्हणून नाव कमवू शकतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रा इरफानच्या मुलाला संधी देणार आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबिलचा पहिला चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अभिनेत्री अनुष्का शर्माच्या खांद्यावर आहे. तर चित्रपटाचं चित्रीकरण सध्या काश्मीरमध्ये सुरू आसल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 



खुद्द बाबिलने आपण बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत असल्याची घोषणा केली आहे. बाबिला अभिनेता व्हायचं होतं. अशी इच्छा त्याने काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. बाबिलने 'करीब सिंगल' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका सांभाळली.