आपण पुन्हा भेटेपर्यंत.... इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट
दुर्मिळ आजाराने बॉलिवूडच्या दुर्मिळ अभिनेत्याचा जीव घेतला.
मुंबई : 'हासिल', 'मकबूल', 'लाईफ इन मेट्रो', 'पानसिंह तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'पिकू', 'तलवार' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेता इरफान खानने २९ एप्रिल रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. तो ५४ वर्षांचा होता. आपण एका दुर्मिळ आजाराशी झुंजत असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. न्युरो एन्डोक्राईन ट्युमर या आजाराने तो ग्रस्त होता. या दुर्मिळ आजाराने बॉलिवूडच्या दुर्मिळ अभिनेत्याचा जीव घेतला.
त्याच्या अशा अचानक निघून जाण्याने इरफानच्या कुटुंबाला, चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या मोठ्या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न त्याची मुले आणि पत्नी करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे कुटुंब जुन्या आठवणींना नेहमी उजाळा देताना दिसतात. त्याच्या पत्नीने फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.