VIDEO : ऐश्वर्यानं फोनच्या वॉलपेपरवर ठेवलाय आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?
Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan`s Photo : ऐश्वर्या रायच्या वॉलपेपवर आहे आराध्या आणि अमिताभ यांचा फोटो?
Aishwarya Rai Wallpaper Aaradhya and Amitabh Bachchan's Photo : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नुकतीच दुबईवरून भारतात परतली आहे. दुबईत ऐश्वर्या ही ग्लोबल वूमन फोरमच्या कार्यक्रमासाठी गेली होती. त्यानंतर भारतात आलेल्या ऐश्वर्याला पाहताच पापाराझींनी तिचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यापैकी ऐश्वर्याच्या एका व्हिडीओत मुंबईत परतलेल्या ऐश्वर्याच्या फोननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या फोनवर असलेला वॉलपेपर.
ऐश्वर्याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. यात ऐश्वर्या विमानतळावरून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. ऐश्वर्यानं यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. पापाराझींना पाहताच ऐश्वर्या ही स्माईल करते. तिच्या गाडीच्या दिशेनं जात असताना अचानक तिच्या फोनची स्क्रिन कॅमेऱ्यात कैद होते तर त्यात दिसून आलं की ऐश्वर्याचा फोनचं वॉलपेपरवर ऐश्वर्याची लेक आराध्या आहे. पण यावेळी आराध्या कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत दिसते. हे पाहताना अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं की आराध्याचा हा फोटो तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा आहे. तर अनेकांनी म्हटलं की हा फोटो ऐश्वर्याची दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्यासोबतचा आहे.
दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर ऐश्वर्याच्या सुंदरतेवर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'दिवसेंदिवस ती आणखी सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'माझी आवडती अभिनेत्री, सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी ऐश्वर्या.' तिसरा नेटकरी आराध्याचा उल्लेख करत म्हणाला, 'पहिल्यांदा आराध्या तिच्यासोबत दिसली नाही.' दुसरीकडे एक नेटकरी अमिताभ यांचा उल्लेख करत म्हणाला, 'अमिताभ बच्चन यांच्या फोटोकडे कोणाचं लक्ष गेलं.'
हेही वाचा : 'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना ठरली सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री? श्रीवल्लीनं सोडलं मौन
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. ते दोघं एकत्र कुठे दिसले नाही. इतकंच नाही तर अनंत आणि राधिकाच्या लग्नातही ते वेगळे वेगळे कार्यक्रमात आले. अभिषेक बच्चन कुटूंबासोबत आला तर ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत आली होती. मात्र, त्यापैकी एका कार्यक्रमात त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्याशिवाय ऐश्वर्यानं नुकताच आराध्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहताच सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. इतकं सगळं असताना त्यांचा चाहत्यांना आशा आहे की त्या दोघांनी घटस्फोट घ्यायला नको.