Aishwarya Rai- Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे कपल नेहमीच त्यांच्या चाहत्यांचं आवडतं कपल आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमी चर्चेत असते. नेहमी चर्चेत असणारी ही जोडी आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे जे ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या बिनसल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. पुन्हा एकदा या दोघांच्या दुराव्याच्या बातमीने जोर धरला आहे. नेहमी प्रत्येक गोष्टीवर रिएक्ट होणारी ही जोडी यावेळी मात्र काही न बोलताना दिसली. याचदरम्यान ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्ट तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टमुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याच्या पोस्टमुळे अभिषेक-ऐश्वर्याच्या दुराव्याच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब? नुकतंच ऐश्वर्या रायचे वडिल कृष्णराय यांच्या जयंतीनिमीत्त तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये एका फोटोत आराध्या आणि तिचे वडिल दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोच ऐश्वर्या तिच्या वडिलांसोबत दिसत आहे. तर तिसऱ्या फोटो ऐश्वर्या तिची आई तिची लेक आराध्यासोबत दिसत आहेत या फोटोच्या पाठीमागच्या बाजूला तिच्या वडिलांच्या फोटोची फ्रेम दिसत आहे. हे फोटो ऐशने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


हे फोटो शेअर करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'लव्ह यू ऑलवेज, डिअरेस्ट डिअर डॅडी-अज्जा. मोस्ट लव्हिंग, काळजी घेणारा, स्ट्रॉन्ग, generous and righteous तुमच्यासारखा कोणीच नाही... तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या स्मरणार्थ प्रार्थना. आम्हाला तुमची खूप आठवण येते. अशा आशयाचं कॅप्शन ऐश्वर्याने तिच्या या पोस्टला दिलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. खरंतर हे फोटो शेअर केल्यावर मात्र ऐश्वर्या अभिषेकच्या चाहत्यांना वेगळीच काळजी वाटत आहे. खरंतर ही काळजी वाटण्यामागचं कारण म्हणजे .  ऐशने अभिषेकसोबतचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यामुळे या दोघांमध्ये दुरावा आल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.




ऐश्वर्याने हे फोटो पोस्ट करताच अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या विभक्त झाल्याची चर्चाही सुरू झाली. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'प्रिय ऐश.. तू कधीच आराध्या आणि अभिषेकसोबत फोटो का काढत नाहीस.. तुझ्या फॅमिलीचे फारच कमी फोटो आहेत, त्यामुळे तुम्ही वेगळे झाला आहात का?' अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स युजर्स तिच्या या पोस्टवर करत चिंता व्यक्त करत आहेत.या दोघांच्या दुरावाच्या बातम्या समोर येणं हे काही नावीन्य नाही. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी अनेकदा जोर धरला होता.  मात्र कधीच या दोघांनीही यांवर आपलं मत मांडल नाही.