मुंबई : अक्षय कुमार जिथे रजनीकांतसोबत सिनेमा 2.0 चं कौतुक स्विकारत आहे. तिथेच दुसरीकडे देशभक्त अक्षय कुमार मात्र ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक सिनेमात अक्षय कुमारने स्वतःला बॉलिवूडचा भारत कुमार असल्याचं सिद्ध केलं आहे. पण आता त्याने असं काही केलं आहे ज्यामुळे चाहते अक्षयवर प्रचंड भडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देशभक्ताची भूमिका साकारत असणारा अक्षय कुमार 'भारतीय नागरिक' नाही. हल्लीच अक्षय कुमारचा कॅनडावरील प्रेम दर्शवणारा व्हिडिओ समोर आला आहे. 


या व्हिडिओमुळे अक्कीवर चाहते भरपूर नाराज झाले आहेत. त्यांनी अक्षयला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 



अक्षय एका व्हिडिओत सांगत आहे की, मी तुम्हाला हे जरूर सांगेन की हे माझं घर आहे. टोरंटो माझं घर आहे. एकदा बॉलिवूडमधून निवृत्त झाल्यावर मी इथे पुन्हा येणार आहे. आणि इथेच राहणार आहे. अक्षयच्या या वाक्यामुळे सोशल मीडियावर खूप गोंधळ उडाला आहे. चाहते आतापर्यंत अक्षय कुमारच्या देशभक्तीचं उदाहरण देत होते पण आज त्याच्या या वक्तव्यामुळे ते नाराज झाले आहेत.


युझर्स या व्हिडिओ खाली वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहे. देशभक्ती विकून देशातील पैसा टोरंटोत घेऊन जाणार आहे. आणि इथे लोकं नसीरूद्दीन शाह यांना गद्दार म्हणत आहे. 


एकाने तर लिहिलं आहे की, अक्षय तू देशभक्तीच्या नावावर सीमेंट विकत आहे. या सगळ्या गोष्टींच भान ठेवा.