Sunny Leone ची लादेनला भुरळ; खरं वाटत नाहीये, तर हे पाहा
ओसामा बिन लादेन याच्याही मनावर राज्य करत होती.
मुंबई : बॉलिवूडमध्ये समोर येणारी प्रत्ये बातमी भुवया उंचावून जाते. रिलेशनशिपपासून ब्रेकअपपर्यंत आणि नव्या चित्रपटांपासून कलाकारांच्या कमाईपर्यंत प्रत्येक गोष्टीबाबतची माहिती म्हणजे उत्सुकता शिगेला पोहोचवणारी. एक लहानसा माहितीचा दुवाही, या जगतामध्ये पुरेसा ठरतो. (Sunny leone)
सध्या अभिनेत्री सनी लिओनी, हिच्या नावाची अशीच चर्चा सुरु आहे. सनीच्या नावाला ज्या मुद्द्यामुळे चर्चेचं वलय प्राप्त झालं आहे, ते पाहता तुम्हालाही धक्काच बसेल.
सनी, हिंदी चित्रपटसृष्टीत 'बेबी डॉल' म्हणून प्रसिद्ध असणारी ही सौंदर्यवती म्हणे कुख्यात दहशतवादी, ओसामा बिन लादेन याच्याही मनावर राज्य करत होती.
खुद्द सनीलाही जेव्हा ही बाब कळली तेव्हा तीसुद्धा हैराण झाली. काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या ऐबताबाद येथील लादेनच्या घरी सनीच्या व्हिडीओचं मोठं कलेक्शन सापडलं होतं.
अमेरिकच्या विशेष सैन्य तुकडीनं जेव्हा लादेनचा खात्मा केला त्यावेळी या व्हिडीओचं कलेक्शन समोर आल्याचं म्हटलं गेलं.
सनीच्या कानावर जेव्हा हे सर्व पडलं तेव्हा, आपल्याला आधी ही थट्टा वाटल्याचं ती म्हणाली. आपण याबद्दल फारसा विचार केला नसल्याचं म्हणत सनीनं यापुढे सदर प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सनीवर भाळणारे अनेकजण आहेत, पण जेव्हा खुद्द लादेनच आपल्यावर भाळला हे कळलं तेव्हा मात्र सनीला काही क्षणांसाठी व्यक्त कसं व्हावं हेच कळेना.